सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी
गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुवनी
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी
जय देव, जय देव
जय देव, जय देव, जय श्री हनुमंता
तुमचेनी प्रसादें न भी कृतांता
जय देव, जय देव
दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द
थरथरिला धरणीधर मानीला खेद
कडाडिले पर्वत उडुगणउच्छेद
रामी रामदासा शक्तिचा शोध
जय देव, जय देव
जय देव, जय देव, जय श्री हनुमंता
तुमचेनी प्रसादें न भी कृतांता
जय देव, जय देव





