TUZYAVINA
Bela Shende
काही वेगळेच जाणवे मनाला
बहर हा नवा, क्षणाला
तूच आणि मी, बाकी ना कुणी
काहीही सुचे न वेगळे, तुझ्याविना
स्वप्न ना उरे, तुझ्याविना
स्पंदने मुकी,
तुझ्याविना....
घडले नवेच काहिसे,
जडले मनास हे पिसे
मनातल्या मनात मी तुझी होत गेले
भास वाटतो जन्म हा, तुझ्याविना
दाटते धुके, तुझ्याविना
हरवतेच मी,
तुझ्याविना....
उरला न चेहरा कसा
बनले तुझाच आरसा
हळूहळू तुझ्यापरी दिसू लागले
भासतेच शून्य आज मी, तुझ्याविना
शब्द शोधते, तुझ्याविना
मौन बोलते,
तुझ्याविना.....





