गीतः मला सांग ना
रानी वनी पानी का गाऊ लागे हिरवाई ?
वारा ईषारा देई हळूवार सांगे काही,
भाळी आभाळाच्या का लाली पसरावी ?
अनवट वाट सांगे चल जावू नवख्या गावी,
नाही वर्शा तरी मृद्गंध आला कसा ?
ओलेता चिंब हा आसमंत झाला कसा ?
मला सांग ना रे मना, मला सांग ना रे मना,
मला सांग ना रे मना, मला सांग ना ।। धृ ।।
सावली विसावली, अंतरी दिगंतरी,
भाळ तू सांभाळ तू, ऊन मी ऊनाड मी,
अनुबंध बंधात, गंध रंध्रात हा भरावा उरावा,
नाही वर्शा तरी मृद्गंध आला कसा ?
ओलेता चिंब हा आसमंत झाला कसा ?
मला सांग ना रे मना, मला सांग ना रे मना,
मला सांग ना रे मना, मला सांग ना ।। 1 ।।
गायचे मागायचे, धारांतूनी अधरातूनी,
मिठीत ये मिठास ही पेटूनी लपेटूनी,
सौंदर्य दर्यात, रंग तरंगातला नवासा हवासा
नाही वर्शा तरी मृद्गंध आला कसा ?
ओलेता चिंब हा आसमंत झाला कसा ?
मला सांग ना रे मना, मला सांग ना रे मना,
मला सांग ना रे मना, मला सांग ना ।। 2 ।।


