पान जागे, फूल जागे, भाव नयनी जागला
चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला
चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला
चांदण्याचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला
चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला
चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला
स्पर्श हा रेशमी, हा शहारा बोलतो
सूर हा, ताल हा, जीव वेडा डोलतो
रातराणीच्या फुलांनी देह माझा चुंबिला
चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला
चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला
लाजरा, बावरा हा मुखाचा चंद्रमा
अंग का चोरीसी दो जिवांच्या संगमा?
आज प्रीतीने सुखाचा मार्ग माझा शिंपिला
चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला




