सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी
करिडळमळ भूमण्डल सिंधूजळ गगनी
कडाडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुवनी
सुरवरनरनी शाचर त्या झाल्या पळणी
जय देव जय देव, जय श्री हनुमंता
तुमचेनि प्रसादें न भय कृतांता
जय देव जय देव
दुमदुमली पाताळें उडिला प्रतिशब्द
थरथरला धरणी धर्मानीला खेद
कडाडिलें पर्वत उडगण उच्छेद
रामी रामदासा शक्तीचा शोध
जय देव जय देव, जय श्री हनुमंता
तुमचेनि प्रसादें न भय कृतांता
जय देव जय देव


