"शिवपुत्र शंभू"
"श्री शंभो शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते।"
"यदंकस्येविनी लेखा वर्तते कस्यनोपरि॥"
SSSSSSSSSS
कधी न हरला
कुणा न डरला
छावा आमचा शिवबाचा
मागे न फिरला
पुरून उरला
बछडा निधड्या छातीचा ।।धृ।।
सुरात छावा
उरात छावा
मनामनामध्ये छावा
जीवात छावा
शिवात छावा
कणाकणामध्ये छावा (कोरस)
(शिवपुत्र तू अजोड शंभू
वीर मराठा अथांग शंभू
समरप्रतापी अजिंक्य शंभू
रुद्रभक्त तू अनादी शंभू
धर्मवीर तू अभंग शंभू
प्रकांडपंडित अनंत शंभू
जनप्रतिपालक भवतू शंभू
दृष्ट संहारक जयतू शंभू
मृत्युंजय तू जगतू शंभू)
हाती एका समशेर घेऊनी
घेई लेखणी दुजा हाती
भाषा पंडित कवी मनाचा
शब्दांचाही शस्त्रपती
त्वेषात लढला
गनीमा भिडला
मेरुमणी तू वीरांचा ।।१।।
शंभर आणिक वीस लढाया
एक न हरला कधी कुठे
लढून जगता जगून लढता
गवतालाही भाले फुटे
नभात भारला
श्वासात उरला
विचार शक्ती-युक्तीचा।।२।।
रुद्रभक्त अन् युगनायक तू
बुधभूषणम् चा रचियेता
प्रजादक्ष अन् स्वराज्य रक्षक
धर्मवीर तू रणजेता
कीर्तिवंत तू
नीतीवंत तू
मुजरा तुजला मानाचा ।।३।।
Lyrics-Vibhishan Chavare





