चैत्राच्या पालवीच्या पसरला सुगंध
गगनात मावेना माझा आनंद गं
खुळ्या माझ्या जीवाचे झाले लई हाल गं
तुझ्यासाठी राखलेला खुलला हा बांध गं
सोडू नको दूर जावू नको
पापणीला स्वप्न असे दावू नको
सोडू नको दूर जावू नको
पापणीला स्वप्न असे दावू नको
रंग नव्या नात्याचा
हळू हळू फुलेल गं
मिठी तुझी लाजरी
सांग कधी भेटेल गं
असा मनात बसेल गं
तुझ्या सोबती असेल गं
तुझी माझी जोडी
भारी शोभून दिसेल गं
नव्या नव्या नात्याचे फुलून आले बंध गं
तुझ्या सवे सोबतीचा जडलाय छंद गं
ध्यानी मनी नसतं काही नाही त्याचा नेम गं
कासावीस होतो जीव तुझा माझा सेम गं
सोडू नको दूर जावू नको
जवळ ये चोरून असं पाहू नको
सोडू नको दूर जावू नको
जवळ ये चोरून असं पाहू नको
रंग नव्या नात्याचा
हळू हळू फुलेल गं
मिठी तुझी लाजरी
सांग कधी भेटेल गं
रंग नव्या नात्याचा
हळू हळू फुलेल गं
मिठी तुझी लाजरी
सांग कधी भेटेल गं
सोबतीचे क्षण सारे सोन्याहून भारी गं
जगून घे हसून घे जमली अशी यारी गं
चमचमत्या चांदण्यात तुझे डोळे दर्पण
मिठी तुझी गंध तुझा दरवळतो चंदन
चमचमत्या चांदण्यात तुझे डोळे दर्पण
मिठी तुझी गंध तुझा दरवळतो चंदन
सोडून तुला सुचत नाही
प्रेमात तुझ्या रमत जाई
होकार कळव आता माझा जीवच वाचेल गं
रंग नव्या नात्याचा
हळू हळू फुलेल गं
मिठी तुझी लाजरी
सांग कधी भेटेल गं
रंग नव्या नात्याचा
हळू हळू फुलेल गं
मिठी तुझी लाजरी
सांग कधी भेटेल गं



