तु अंबरात ही भासा परी
तु अंतरात ही श्वासा परी
मौनात स्वर तुझा रेंगाळतो
एकांत तुझा सवे झंकारतो
ऐकावी वाटते स्पर्शातली कविता पुन्हा-पुन्हा

चाहूल तुझी बहाराची, हिरव्या ऋतुची, सर पावसाची
कधी तु धग चांदण्याची, एका क्षणाची तरीही युगांची
प्राजक्त फिरतो जसा
सहवास तुझा हा कसा
शब्दात सांगता न ये
हा क्षण दरवळी असा
ऐकावी वाटते स्पर्शातली कविता पुन्हा-पुन्हा
ऐकावी वाटते स्पर्शातली कविता पुन्हा-पुन्हा
बेधुंद आसमंत सारा बेभान वारा, गहिरा इशारा
एकाच लाटे साठी जणू आतुर झाला अवघा किनारा
कितीही भेटलो तरी
भेटावे वाटते पुन्हा
अशी का ओढ लागते?
का होते असे सांगना?